Saturday, August 2, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : गर्दीचा फायदा घेत अंबाबाई मंदीर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

Kolhapur : गर्दीचा फायदा घेत अंबाबाई मंदीर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

नवरात्रीमुळे मागच्या दोन दिवसांपासून अंबाबाई मंदिरात मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, लाखो भाविक येत असल्याने गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मंदीर परिसरात धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. अंबाबाई मंदिरात महिला भाविकाचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मुख दर्शनाच्या रांगेत असलेल्या एका महिलेचे 70 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र सोनबत्ती जाटब या महिलेने चलाखीने लंपास केले होते. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. जुना राजवाडा पोलिसांत याची नोंद होताच तात्काळ पोलिसांनी चोरट्या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या दोन दिवसांपासून अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, या गर्दीचा फायदा घेत चोरी करण्यासाठी काही महिला सक्रीय झाल्याची माहिती समोर आली आहे.

भाविकांच्या दर्शन रांगेसाठी मोठी गर्दी असल्याने महिला दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला टाकण्यात आला. दरम्यान ही बाब सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने चोरी केलेल्या महिलेचा चेहरा लक्षात आला. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -