शारदीय नवरात्रोत्सवात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी राज्य, देशपरदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. संस्थापक, अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तहान भागविण्यासाठी करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिर परिसरात पाणपोईची सोय केली आहे. दोन दिवसात हजारो भाविकांनी पाणपोईचा लाभ घेतला. लोकमान्यच्या या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक होत आहे.
‘लोकमान्य’च्या पाणपोईचे उद्घाटन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, सेवा निवृत्त कृषी उपसंचालक सुधर्म जामसांडेकर, लोकमान्यचे क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पाटील-वाकरेकर यांच्या हस्ते झाले. अंबाबाई मंदिरात दर्शनाला आलेल्या भाविकांना पाणी देवून त्यांचे स्वागत केले. सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक वर्षी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीतर्फे पाणपोईसह विविध उपक्रम राबवले जातात. यंदाही पाणपोई उपक्रमाचाही हजारो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी विपणन व्यवस्थापक अभयसिंह जमाले पाटील, ऋतुराज दळवी, अवधूत जांभीलकर, विजय आरडे, कबीराज, स्वप्नील माने, विनायक शिरोडकर, धनंजय सुतार, आदी उपस्थित होते.