Monday, August 4, 2025
HomeसांगलीMurder in Sangli: सांगलीत महाविद्यालयीन तरुणाचा निर्घृण खून

Murder in Sangli: सांगलीत महाविद्यालयीन तरुणाचा निर्घृण खून

सांगली शहरातील कर्नाळ रस्त्यावर एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा धारधार शस्त्रांनी खून (college student murder in Sangli) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पूर्वीच्या भांडणातून हा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.

सांगली शहरात एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा धारधार शस्त्रांनी खून केल्याचा (19 year old college student got murdered) धक्कादायक प्रकार घडला आहे. अजित बाबुराव अंगडगिरी असे या तरुणाचे नाव आहे. सांगलीतील कर्नाळ रस्त्यावर हा निर्घृण खून करण्यात आला.

धारधार शस्त्रांनी हल्ला: महाविद्यालयात शिकणारा अजित हा पद्माळे फाटा येथील माधवनगर रस्त्यावर आपल्या शेतात औषध फवारणीचे काम करत होता. सायंकाळच्या सुमारास तीन तरुण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अजितला शेतातून बाहेर बोलवून घेतले. रस्त्यावर येताच त्यांनी त्याच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला ज्यामध्ये अजित याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर तिघा हल्लेखोर तरुणांनी घटनास्थळावरून पलायन केले.

उपचारापूर्वीच मृत्यू: हल्ल्यानंतर अजित याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात केली गेली असून पूर्वीच्या भांडणातून हा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या घटनेचा पुढील तपास चालू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -