Thursday, December 18, 2025
Homeतंत्रज्ञानJio 5G SIM: असा घ्या सुपरफास्ट इंटरनेटचा लाभ! घरबसल्या ऑर्डर करा 5G...

Jio 5G SIM: असा घ्या सुपरफास्ट इंटरनेटचा लाभ! घरबसल्या ऑर्डर करा 5G SIM; ही आहे सोपी पद्धत

देशात आजपासून फाईव्ह-जी (Jio 5G) सेवेला प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ (Jio 5G SIM Launch) करण्यात आला आहे. अशात तुम्ही देखील Jio 5G सिम घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. सामान्यतः लोक स्थानिक दुकानात जाऊन सिमकार्ड खरेदी करतात. मात्र Jio 5G सिमसाठी तुम्हाला कुठेही जावे लागणार नाही. घरबसल्या तुम्हाला हे सिम कार्ड मिळणार आहे. यासाठी तुम्हाला एका सोप्या प्रक्रियेतून जावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सिम कार्ड थेट घरपोच मिळणार आहे. पूर्वीच्या तुलनेत आता सिमकार्ड खरेदी करणे खूप सोपे झाले आहे. आम्ही तुम्हाला अशाच एका प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सिम कार्ड घरपोच मिळेल. विशेष म्हणजे या प्रक्रियेत वापरकर्त्यांची पूर्ण काळजी घेतली जात आहे.

असं मिळवा Jio 5G सिम
हे सिम मिळवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला जिओच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. याठिकाणी Get Jio SIM चा पर्याय दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि मोबाईल विचारला जाईल. तुम्ही नाव आणि क्रमांक टाकल्यानंतर, तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेसह पुढे जावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. हा OTP तुम्हाला सबमिट करावा लागेल. त्यानंतर शेवटी पोस्टपेड सिम घ्यायचे आहे की प्रीपेड सिम याबाबत विचारण्यात येईल. त्यानुसार तुम्हाला जे सिम हवे ते तुम्ही निवडू शकतात. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला घराचा पत्ता विचारला जाईल. तुमच्या आधारकार्डवर जो पत्ता आहे तो पत्ता नमूद करा. दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला सिम डिलिव्हरी केली जाईल. Jio 5G साठी सिम घ्यायचे असेल तर तुम्हाला ही प्रक्रिया फॉलो करावी लागेल.

पंतप्रधानांच्या हस्ते झाला शुभारंभ
देशात गेल्या अनेक दिवसांपासून Jio 5G बाबतही चर्चा सुरू होती. या सेवेबद्दल अनेकांना उत्सुकता होती. ही सेवा 4G सेवेपेक्षा अधिक जलद नेटवर्क देतो. अशातच आज दिल्लीतील प्रगती मैदानावर पंतप्रधान यांच्या हस्ते Jio 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. यानिमित्ताने देशाने तंत्रज्ञानाच्या नवीन युगात प्रवेश केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -