Friday, December 19, 2025
HomeमनोरंजनSalman Khan च्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात होणार Ram...

Salman Khan च्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात होणार Ram Charan ची एन्ट्री!


बॉलिवूडचा ‘सुलतान’ अर्थात अभिनेता सलमान खान आणि साऊथचा सुपरस्टार राम चरण एकाच पडद्यावर दिसणार आहेत. सलमान खानच्या आगामी चित्रपटामध्ये राम चरण एन्ट्री घेणार आहे. राम चरण आणि सलमानच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जेव्हा ही बातमी राम चरणच्या चाहत्यांना कळाली तेव्हापासून ते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सलमान खानच्या ‘गॉडफादर’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलर लाँचसाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सलमान खान आणि चिरंजीवी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान दोघांनी चित्रपटाविषयी अनेक किस्से सांगितले. या कार्यक्रमातच सलमान खानने सर्वांना आनंदाची बातमी दिली खास म्हणजे राम चरणच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच आनंददायी आहे. कारण सलमान खानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये राम चरणची एन्ट्री होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -