अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या नवरात्री सेलिब्रेशनसाठी अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. अशातच अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.
कतरिना आणि रणबीर कपूर केरळमधील त्रिशूर येथील कल्याणरामन निवासस्थानी नवरात्री उत्सवाला एकत्र आले होते.रणवीर आणि कतरिना यांच्याबरोबर साऊथ अभिनेता नागार्जुन आणि आर माधवन हे कलाकारही या सोहळ्याला आले होते.
अनेक वर्षांनी कतरिना आणि रणबीर यांना एकत्र पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
कतरिना आणि रणबीर 2016मध्ये एकमेकांना डेट करत होते. दोघांनी एकत्र अनेक सिनेमात काम केलं.
अजब प्रेम की गजब कहानी, राजनीती, जग्गा जासूस सारख्या सिनेमात एकत्र काम केलं होतं.दीपिका नंतर रणबीर कतरिना कैफबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. मात्र कतरिनाबरोबरही त्यानं ब्रेकअप केला.
त्यानंतर रणबीरनं आता आलिया भट्टबरोबर लग्न केलंय. तर कतरिनानं अभिनेता विकी कौशलबरोबर लग्न केलं.