Sunday, February 22, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर : भारत जोडो यात्रा केंद्रातील भ्रष्ट सरकार नष्ट करेल; काँग्रेसच्या एच....

कोल्हापूर : भारत जोडो यात्रा केंद्रातील भ्रष्ट सरकार नष्ट करेल; काँग्रेसच्या एच. के. पाटील यांचा घणाघात


कोल्हापूर : काँग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांची देशभरात निघालेली भारत जोडो यात्रा केंद्रातील भाजपचे भ्रष्ट सरकार नष्ट करेल, असा घणाघात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शनिवारी येथे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटी आश्वासने देत दिशाभूल करीत आहेत. यामुळे ते वचनभ्रष्ट झाल्याची टीकाही त्यांनी केली. भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर येथील दसरा चौकात आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांची प्रमुख उपस्थितीत होते.



पाटील म्हणाले की, भाजपने देशातील प्रत्येकाच्या बँक खात्यावर पंधरा लाख रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. दोन कोटी उद्योग उभारून बेरोजगारांना रोजगार देवू असे सांगितले होते. पण ते सत्तेवर आल्यानंतर पंधरा लाख दिले नाहीत. दोन कोटी उद्योग बंद पडले. बेरोजगारी वाढली. यामुळे मोदींची प्रतिमा वचनभ्रष्ट अशी झाली आहे. भाजप सत्तेचा वापर करून विविध जाती, धर्मात तेढ निर्माण करीत आहे. भारताच्या एकात्मतेला धक्का पोहचवत आहे. यामुळेच काँग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांनी भारत जोड यात्रा काढली. या यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात्रेमळे राहल गांधी यांची प्रतिमा उजळली आहे. भाजपाच्या माध्यमातून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. पण भारत जोडो यात्रेने त्याला सडेतोड प्रत्युतर दिले आहे. ते चांगलं काहीतरी घडवतील हा विश्वास जनतेच्या मनांत तयार होवू लागला आहे हेच यात्रेचे फलित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -