ताजी बातमी ऑनलाईन टीम
दिवाळी आली की महिलांसाठी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे खरेदी. त्यातही साडी खरेदी करण्याचा आनंद काही वेगळाच. तुम्हीही यंदा दिवाळीला कोणत्या प्रकारची साडी घ्यायची असा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सध्या ट्रेंडमध्ये असलेले साडीचे एक से एक प्रकार नक्की लक्षात ठेवा.
१.प्युअर सिल्कमध्ये थोडी मोठी बॉर्डर असलेल्या या प्रकारच्या साड्या सध्या फॅशन इन आहेत. गडद रंग, लहान आकाराची बुट्टी आणि गोल्डन रंगाच्या काठामध्ये केलेले सुंदर नक्षीकाम ही या साडीची खासियत आहे.
२. टिळक पैठणी नावाने ओळखली जाणारी ही साडी सेमी सिल्क प्रकारात येते. यावरचे बुट्टे नेहमीसारखे गोल किंवा कोयऱ्यांचे नसून चौकोनी शंकरपाळ्याच्या आकाराचे आहेत. त्यामुळे ही साडी उठून दिसते. पैठणीची पारंपरिक बॉर्डर असल्याने ट्रॅडीशनल पण थोडा ट्रेंडी लूक हवा असेल तर हा उत्तम पर्याय आहे.