ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईतील प्रभादेवी आणि दादर येथे या दोन गटात झालेल्या वादानंतर आता ठाण्यात पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. दसरा मेळाव्याला निघालेले असताना ठाण्यात शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आले आणि एकमेकांविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल केला असून याप्रकरणी 13 शिवसैनिकांना (Shiv Sainik) अटक होण्याची शक्यता आहे. यामुळे आता ठाण्यातील वातावरण तापले आहे. पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेवून चौकशी केली.
दसरा मेळाव्याकरता ठाण्यातून शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक शिवाजी पार्क येथे सभेकरता निघाले होते. याच दरम्यान काही शिवसैनिकांनी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या विरोधात अश्लिल भाषेत घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी पोलिसांसमोर झाल्याचे सांगण्यात येत आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.