Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; राष्ट्रकुलमधून कुस्तीला वगळणे भारतीय मल्लांसाठी धक्कादायक

कोल्हापूर ; राष्ट्रकुलमधून कुस्तीला वगळणे भारतीय मल्लांसाठी धक्कादायक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बर्मिंगहॅममध्ये (लंडन) दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून भारताचे वर्चस्व असलेल्या नेमबाजीला वगळले होते. याची चर्चा अद्यापही ताजी असताना 2026 साली ऑस्ट्रेलियात होणारया राष्ट्रकुलमधून भारतीय मल्लांची दादागिरी असलेल्या कुस्तीला वगळण्याचा घेतलेला निर्णय भारतीय मल्लांसाठी धक्कादायक ठरला कमालीचा संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. राष्ट्रकुलचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत मेहनत करत असलेल्या कोल्हापुरी मल्लांचे तर अवसानच ढळले आहे. भारतीय ऑलिंपिक असोसिएशन व रेस्लिंग असोसिएशन ऑफ इंडियाने पुढाकार घेऊन राष्ट्रकुलमध्ये कुस्तीला समाविष्ट करण्याच्यादृष्टीने ऑस्ट्रेलियन कॉमनवेल्थ असोसिएशनचे मन वळवावे, असे या मल्लांचे सांगणे आहे. राष्ट्रकुलमधील कुस्ती स्पर्धेला मुकणारया मल्लांचे जागतिकपातळीवरील करीअर धोक्यात येईल, अशी भीतीही मल्ल व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलियन कॉमनवेल्थ असोचा जाहीर निषेध…



राष्ट्रकूलमधून कुस्ती स्पर्धा वगळणारया ऑस्ट्रेलियन कॉमनवेल्थ असोसिएशनचा राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाने जाहीर निषेध नोंदवला आहे. जगभरातील कुस्ती व मल्लांचा विचारच न करता राष्ट्रकुलमधून कुस्तीला वगळण्याचा बेजबाबदारपणा असोसिएशनने दाखवला आहे. या असोसिएशनवर कुस्तीत मात्तबर असलेल्या इराण व रशियासह जगभरातील कुस्तीप्रेमींनी टिकास्त्र सोडले आहे. लंडनमध्ये झालेल्या राष्ट्रकुलमध्ये भारतीय 12 मल्लांनी 12 वजनी गटात हुकूमत गावजत 6 सुवर्ण, 1 रौप्य व 5 कांस्य पटकावले होते. या पदकी कामगिरीमुळे भारत पदकतालिकेत तिसरया स्थान – आला होता.

भारतीय मल्लांवर अन्याय… राष्ट्रकुलमधून कुस्ती स्पर्धेला वगळून ऑस्ट्रेलियाने जगाचा रोष ओढवून घेतला आहे. ऑस्ट्रेलियात कुस्तीला फारसे महत्व दिले जात नाही हेही दिसून येत आले आहे. आपल्या राष्ट्रात कुस्ती करणारे मल्ल कमी आहेत, म्हणून राष्ट्रकुलमधून कुस्तीला वगळण्याचा खोडसाळपणे ऑस्ट्रेलियन कॉमनवेल्थ असोसिएशनने घेतलेला निर्णय संतापजनक आहे. शिवाय हा निर्णय गेल्या दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रकुलला डोळ्यासमोर ठेवून मेहनत करत असलेल्या भारतीय मल्लांवर अन्याय करणारा ठरत आहे.



ऑस्टेलियन कॉमनवेल्थ असोसिएशनने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. हसन पटेल (शाहूविजयी गंगावेश तालीम)
ऑस्ट्रेलियात कुस्तीला महत्व नाही की काय राष्ट्रकुलअंतर्गत कोणकोणत्या खेळांच्या स्पर्धा आयोजित करायच्या याचा सर्वाअधिकारी हा ज्या देशात राष्ट्रकुल आयोजित होते, त्या देशाला आहे. राष्ट्रकुलमध्ये कुस्ती स्पर्धा ठेवली तर आपले मल्ल त्यात फारशी कामगिरी करु शकणार याची भीती ऑस्ट्रेलिया वाटू लागली आहे, की काय अशी शंका येऊ लागली आहे. यदाकदाचित कुस्तीत अन्य राष्ट्रांच्या मल्लांनी जास्ती पदके मिळवली तर ऑस्ट्रेलियाचे पदकतालिकेतील स्थान निश्चित घसणार आहे. या भीतीपोटीच ऑस्ट्रेलियाने राष्ट्रकुलमधून कुस्ती स्पर्धेला वगळले आहे. मल्ल प्रितम खोत (रा. आणूर, ता. कागल. सध्या पुण्यातील – पवार यांच्या आतंरराष्ट्रीय संकुलात सराव)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -