ताजी बातमी ऑनलाईन टीम
सर्वात जास्त वारल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफार्ममध्ये फेसबुकचा समावेश होतो. बहुतांश लोक फेसबुक वापरतात. तुम्ही देखील फेसबुक यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही बातमी कदाचित तुमची चिंता वाढवू शकते. कारण, फेसबुकची मूळ कंपनी मेटा ने एक इशारा दिला आहे. जवळपास दहा लाख फेसबुक वापरकर्त्यांच्या खात्यांची वैयक्तिक माहिती धोक्यात असल्याचे या इशाऱ्यात म्हटले आहे. यात यूजरचे नाव आणि पासवर्ड समाविष्ट आहे. Apple Inc. आणि Alphabet Inc. च्या सॉफ्टवेअर स्टोअर्समधून डाउनलोड केलेल्या काही अॅप्समुळे यूजर्सच्या मोबाइल फोनची सुरक्षा कमकुवत होत ही माहिती चोरीला जाऊ शकते, असे मेटाने म्हटले आहे.
याबाबत मेटाने शुक्रवारी जाहीर केले की, त्यांनी यावर्षी अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवरील 400 हून अधिक व्हायरस-ग्रस्त अॅप्स चिन्हांकित केले आहे. हे अॅप्स इंटरनेट वापरकर्त्यांना लक्ष्य करतात आणि त्यांची लॉगिन माहिती चोरतात.
मेटाने या व्हायरस-ग्रस्त अॅप्सची माहिती गुगल आणि अॅपलसोबत शेअर केली आहे. त्यानंतर हे अॅप्स हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. यावर अॅपलने म्हटले आहे की, 400 पैकी 45 चुकीचे अॅप त्यांच्या अॅप स्टोअरमध्ये होते, जे आता काढून टाकण्यात आले आहेत. गुगलने हे सर्व अॅप्स आपल्या प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत.
फोटो एडिटिंग, गेम्स किंवा हेल्थ ट्रॅकरच्या नावाने फसवणूक
फोटो एडिटर, मोबाइल गेम्स किंवा हेल्थ ट्रॅकर असे अॅप्स यूजर्समध्ये लोकप्रिय आहे. ही बाब लक्षात घेत सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी समान थीम वापरतात. त्यानंतर या अॅप्सच्या माध्यमातून यूजर्सचे अकाउंट उघडून त्यांची वैयक्तिक माहिती चोरली जाते असे ग्लोबल थ्रेट डिसप्शनचे मेटा डायरेक्टर डेव्हिड अॅग्रॅनोविच यांनी संगितले. यावर डेव्हिड यांनी इशारा दिला आहे की, जर एखादे अॅप त्याच्या कोणत्याही वैशिष्ट्यांचे अतिशय चांगले वर्णन करत असेल, जे त्याच्या मते इतर कोणत्याही प्लॅटफॉर्म किंवा सोशल मीडिया साइटसाठी जारी केले गेले नाही, तर त्या अॅपचा हेतू काहीतरी वेगळा असण्याची शक्यता आहे. हे अॅप्सच्या युजर्सला जाळ्यात ओढण्यासाठी अॅप डाउनलोड केल्यानंतर प्रथमच त्यांच्या फेसबुक खात्यातून लॉग इन करण्यास सांगतात. यामुळे त्यांच्याकडे यूजरचे नाव आणि पासवर्ड अॅपमध्ये संग्रहित केले जातात. त्यामुळे अशा अॅपपासून सावध राहा असा इशारा देण्यात आला आहे.