Monday, August 4, 2025
Homeमनोरंजनबहुप्रतिक्षित 'राम सेतू'चा ट्रेलर रिलीज, हातात दगड घेऊन पाण्यावर चालताना दिसला अक्षय...

बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा ट्रेलर रिलीज, हातात दगड घेऊन पाण्यावर चालताना दिसला अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर आगामी ‘राम सेतू’ या चित्रपटाचा ट्रेलर (Ram Setu Trailer) रिलीज झाला आहे. हा चित्रपट ‘राम सेतू’च्या अस्तित्वाच्या वादावर आधारित आहे. घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सतत चर्चेत राहिला. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) दिग्दर्शित हा चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नुसरत भरुचा (Nusrat Bharucha) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अक्षय कुमारच्या या मल्टीस्टारर चित्रपटाचा ट्रेलर अॅक्शन, थ्रिलर आणि थ्रिलने परिपूर्ण आहे.

चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना अक्षय कुमारने सोशल मीडियावर लिहिले की ‘राम सेतूची पहिली झलक तुम्हाला आवडली होती. आशा आहे की तुम्हाला त्याचा ट्रेलर देखील खूपच आवडेल आणि या दिवाळीत तुमच्या संपूर्ण कुटुंबासह राम सेतूच्या दुनियेचा एक भाग व्हा’. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचे संवाद त्यांनी डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्यासोबत मिळून लिहिले आहेत.

या चित्रपटाची कथा राम सेतू वाचवण्याच्या मिशनची आहे. चित्रपटात अक्षय एका पुरातत्त्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे आमि तो राम सेतू खरा आहे की काल्पनिक आहे याची चाचपणी करत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. झी स्टुडिओच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 2 मिनिट 9 सेकंदाचा ट्रेलर पाहिल्यानंतर नक्कीच चित्रपटाविषयीची तुमची उत्सुकता वाढेल.

‘राम सेतू’ चित्रपटाची कथा नास्तिक पुरातत्वशास्त्रज्ञ आर्यन कुलश्रेष्ठ (अक्षय कुमार) भोवती फिरते, त्याला दुष्ट शक्तींनी भारताच्या वारशाचा स्तंभ नष्ट करण्यापूर्वी पौराणिक राम सेतूचे वास्तविक अस्तित्व सिद्ध करण्यास सांगितले जाते. यात अक्षय कुमार राम सेतू उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांशी लढताना दिसत आहे आणि जॅकलीन फर्नांडिस प्रभू रामाचे प्रतीक असलेल्या राम सेतूचे अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

राम सेतूच्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. निर्माते आणि चाहत्यांना अक्षयच्या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर अक्षयचा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये किती धमाका करतो हे दिवाळीच्या मुहूर्तावर लवकरच कळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -