देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक लावा (Lava) कंपनीने सामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत आपला नवीन आणि खूपच स्वस्त 4G स्मार्टफोन ‘Lava Yuva Pro’ भारतामध्ये लाँच केला आहे. या मोबाईल फोनमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
वाचा आकर्षक वैशिष्ट्ये:
डिस्प्ले: Lava Yuva Pro चा अॅस्पेक्ट रेशियो: 20:9, 720 x 1600P रिझोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले, 2.5D कर्व्हड गोरिल्ला ग्लासची सुरक्षा
▪️ ऑपरेटिंग सिस्टम: अँड्रॉईड 12 OS चा सपोर्ट
▪️ फोनची स्क्रीन: या स्मार्टफोनची स्क्रीन IPS LCD पॅनलवर बनली आहे.
▪️ रिफ्रेश रेट: स्मार्टफोन उत्तम चालण्यासाठी 60Hz रिफ्रेश रेट.
▪️ फोन 269PPI तथा 16.7 एम कलरला सपोर्ट करतो.
▪️कॅमेरा: 13MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, दोन 2MP चे कॅमेरा सेन्सर आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा
▪️ रॅम व स्टोरेज: 3GB रॅम, 32GB इंटरर्नल स्टोरेज
▪️पावर बॅकअपसाठी 10 वॅट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5000 एमएएचच्या बॅटरी फोनमध्ये आहे.
▪️उपलब्ध कलर्स: मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक ग्रे व मेटॅलिक ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये फोन खरेदी करता येणार.
लावा युवा प्रो ची किंमत: लावा युवा प्रो (Lava Yuva Pro) या स्मार्टफोनची किंमत 7,799 रुपये असून हा जबरदस्त आणि दिवाळीच्या वेळेस ग्राहकांना मिळणारा स्वस्त स्मार्टफोन लावा कंपनीच्या अधिकृत साईटवरून सध्या खरेदी करता येणार आहे. काही दिवसांत तो ई-कॉमर्स साईटवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.