Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : शिवसेनेची मशाल विरोधकांचा नाश करेल!

Kolhapur : शिवसेनेची मशाल विरोधकांचा नाश करेल!

धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह दिल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवसैनिकांतून नवा उत्साह पाहण्यास मिळत आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांनी तर प्रतिक्रिया देताना शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल केला आहे. मशाल हे क्रांतीचे प्रतीक आहे. हीच मशाल आगामी काळात विरोधकांचा नाश केल्याशिवाय
राहणार नाही, अशा शब्दात संजय पवार यांनी निशाणा साधला आहे.

संजय पवार म्हणाले, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचविले होते. त्यानुसार कार्यवाही केल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत आहे. आता नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर राज्यातील आम्हा लाखो शिवसैनिकांची जबाबदारी वाढली आहे. पक्षाच्या नावातच पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत. हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब आहेत आणि ठाकरे आडनावही आहे. शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात उद्धवसाहेबांनी मी कुणीच नाही. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव असेल तरच त्याला महत्व आहे.

कोटयवधी जनता या नावावर प्रेम करते. त्यांच्या भावनांनुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव लाभले आहे. प्रत्येक शिवसैनिक आणि शिवसेनेची विचारधारा मानणारया शिवसेनाप्रेमींच्या हृदयात धनुष्यबाण चिन्ह आहे. ते गोठविण्याचे पाप शिंदे गटाने केले आहे. हे महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नाही. आगामी निवडणुकांत नवीन मिळालेले नाव आणि मशाल चिन्ह घेऊन उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उतरणार आहे. मशाल चिन्ह महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहचविण्यासाठी आम्ही लाखो शिवसैनिक जीवाचे रान करू. शिवसेनेच्या धगधगत्या मशालीच्या तेज आणि ज्वाळांमध्ये विरोधकांचा नाश होईल, अशा शब्दात संजय पवार यांनी आपल्या भावना मांडल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -