Monday, August 4, 2025
Homeमनोरंजनकियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी लगीन घाई, लवकरच अडकणार विवाह बंधनात; तारीखही...

कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी लगीन घाई, लवकरच अडकणार विवाह बंधनात; तारीखही ठरली!

बी-टाउनमधील (Bollywood Couple) चर्चेत असणारे कपल म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) लवकरच साताजन्माच्या गाठीत अडकणार आहेत. ‘शेरशाह’ (SherShah) चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हे दोघं जवळ आले होते. तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या. मात्र या दोघांनी अनेक दिवस आपले नाते हे लपवून ठेवले होते. काही काळापूर्वी ‘कॉफी विथ करण’मध्ये (coffee with karan) दोघांनीही आपापल्या मनातील सत्य सर्वांना सांगितले. चाहत्यांना ही जोडी खूप आवडत आहे. आता लवकरच हे दोघंही लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर लग्नाची तारीख (Kiara-Sidharth Wedding Date)देखील ठरली असल्याचे सांगितले जात आहे.

सिद्धार्थ कियाराच्या वेडिंग फंक्शन्सबद्दल बोलायचे तर, हे फॅमिली फंक्शन असेल अशी माहिती आहे. लग्नाला बॉलिवूडमधील मोजक्या लोकांनाच आमंत्रित केले जाईल. लग्नाचे बहुतांश कार्यक्रम सिद्धार्थचे कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत दिल्लीत होणार आहेत. कियारा आणि सिडचे आधी रजिस्टर्ड मॅरेज होईल आणि त्यानंतर रिसेप्शननंतर ते कॉकटेल पार्टी ठेवली जाऊ शकते. परंतु रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडमधील कोणत्या सेलिब्रिटीला आमंत्रित केले जाईल हे अद्याप ठरलेले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​पुढील वर्षी एप्रिल महिन्यात दिल्लीत लग्न करणार आहेत. या स्टार जोडप्याने केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीतच लग्न बंधनात बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या जवळच्या सूत्राने मीडिया इन्स्टिट्यूटला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, ‘कियारा आणि सिद्धार्थ पुढच्या वर्षी लग्न करणार आहेत. सिद्धार्थचे कुटुंब दिल्लीत असल्याने लग्नही तिथेच होणार आहे. दोघे आधी रजिस्टर्ड मॅरेज करतील. यानंतर कुटुंबियांसोबत लग्नाच्या विधी पूर्ण होतील. यानंतर बॉलिवूड कलाकारांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले जाईल.’

बॉलिवूडमधील हे क्यूट कपल लवकरच लग्न करणार आहे. मात्र दरम्यान हे दोघंही आपापल्या कामांमध्ये व्यस्त आहे. कियारा अडवाणी सध्या कार्तिक आर्यनसोबत ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रा अजय देवगनसोबत ‘थँकगॉड’ मध्ये दिसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -