Sunday, July 6, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, T20 विश्वचषकातून दीपक चहरची माघार

टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, T20 विश्वचषकातून दीपक चहरची माघार

T20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या अडचणी वाढतच आहे. आधीच टीम इंडियाचा रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर आहे. मात्र आता वेगवान गोलंदाज दीपक चहरलाही दुखापत झाली असून तो देखील या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup) भारतीय क्रिकेट संघ (Team India) ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. दरम्यान, पहिल्याच सराव सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. असे असले तरी टीम इंडियाच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीये. टीम इंडियाला पुन्हा मोठा धक्का बसला असून वेगवान गोलंदाज दीपक चहरने (Deepak Chahar) या स्पर्धेतून माघार घेतली आहे. लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान त्याला दुखापत झाली होती.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. यापूर्वी टीम इंडियाचा रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडले आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी दीपक चहर याच्या नावाची चर्चा होती. मात्र आता वेगवान गोलंदाज दीपक चहरलाही दुखापत झाली असून तो या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. याबाबत BCCI ने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र NCA मध्ये चहर फिटनेस टेस्ट देऊ शकला नाही. तर दुसरीकडे मोहम्मद शमीने फिटनेस टेस्ट पास झाला आहे. जसप्रीतच्या जागी मुख्य संघात त्याची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी दीपक चहरला दुखापत झाली होती आणि त्यानंतर त्याने वन डे मालिकेतून माघार घेतली होती. T20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत तो फिट होईल असे वाटत असताना वेळेत तंदुरुस्त झाला नसल्याने त्याला T20 वर्ल्ड कपमधून माघार घ्यावी लागत आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या जागी त्याची निवड होणार अशी चर्चा होती. मात्र राखीव खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. आता शमीसह तीन गोलंदाज या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहे. दरम्यान, दीपकच्या जागी शार्दूल ठाकूरची निवड झाल्याचे वृत्त आहे.

असे आहे मुख्य स्पर्धेतील टीम इंडियाचे सामने

23 ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, (दुपारी 1:30 वाजेपासून, मेलबर्न)

27 ऑक्टोबर – भारत वि. A गटातील उपविजेता, (दुपारी 12:30 वाजेपासून, सिडनी)

30 ऑक्टोबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका, (सायंकाळी 4:30 वाजेपासून, पर्थ)

2 नोव्हेंबर – भारत. वि. बांगलादेश, (दुपारी 1:30 वाजेपासून, एडलेड)

6 नोव्हेंबर – भारत वि. B गटातील विजेता, (दुपारी 1:30 वाजेपासून, मेलबर्न)

तर 13 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळाला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -