ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई हायकोर्टाने ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या, शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारवा आणि तसे पत्र द्यावे, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर ऋतुजा लटके यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत लढवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
त्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट घेत आनंद व्यक्त केला. यावेळी लटके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मला न्यायदेवतकडून न्याय मिळाला आहे. आपण पतीचा वारसा पुढे नेणार आहे. राजीनामा मंजुर झाल्याची प्रत मिळाल्यानंतर आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे ऋतुजा लटके यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, काँग्रेस नेते व माजी मंत्री सुरेश शेट्टी, विभागप्रमुख व माजी मंत्री अॅड. अनिल परब, शिवसेना विभागप्रमुख तथा माजी मंत्री शिवसेना सचिव अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाआघाडीचे इतर नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.