Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूरः कणेरी मठावर कर्नाटक भवन उभारू देणार नाही, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

कोल्हापूरः कणेरी मठावर कर्नाटक भवन उभारू देणार नाही, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) मठावर येऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री जर कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा करून मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणार असतील, तर शिवसेना त्याला विरोध करेल. सीमाभागासाठी मराठी माणसांनी १०५ हुतात्म्यांचे बलिदान दिले आहे. त्यांच्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरुन जाब विचारेल, असा इशारा शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. या मठाच्या अदृष्य काडसिध्देश्वर महाराजांनीही मठाच्या आडून राजकीय प काम करू नये, असा इशाराही यावेळी देण्यात आला.



कणेरी मठाच्या काडसिध्देश्वर महाराजांच्या माध्यमातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात मठावर पाच कोटी रुपये खर्चुन कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा केली. शिवसेनेने या घोषणेला विरोध केला असून, पत्रकार परिषदेत काडसिध्देश्वर महाराजांचा आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. पवार म्हणाले, कर्नाटकने महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून हे दाखवून दिले की, महाराष्ट्राचे सरकार कुचकामी आहे. विधायक काम करायला शिवसेनेचा विरोध नाही; पण धार्मिकतेच्या नावावर राजकारण खपवून घेणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -