सलमान खान (Salman Khan) त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. आता दिवाळीपूर्वी सलमानने चाहत्यांना एक नवीन खुशखबर दिली आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या टायगर 3 विषयी खास माहिती त्याने शेअर केली आहे. सलमान खान आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) ‘टायगर 3’ (Tiger 3) या चित्रपटाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना आता या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. सलमानने चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली. पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर ‘टायगर 3’ (Tiger 3 On Diwali 2023) चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट यापूर्वी 21 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार होता. सलमानने चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेसह त्याचा एक लुकही शेअर केला आहे.
सलमान खान पुढच्या वर्षी ईदला हा चित्रपट रिलीज करेल अशा चर्चा होत्या. कारण दरवर्षी तो त्याच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून ईदी देत असतो. पण यावेळी भाईजान वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे. चाहत्यांना बराच वेळ वाट पाहायला लावल्यानंतर, अखेर शनिवारी सलमान खानने टायगर 3 ची रिलीज डेट जाहीर केली. ट्विटरवर पोस्ट शेअर करताना सल्लू मियाँने खुलासा केला की, टायगर 3 पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
या पोस्टरमध्ये सलमान खान चेहरा लपवताना दिसत आहे. यामध्ये त्याचा एक डोळा दिसत आहे. तो स्वतःला शत्रूंपासून स्वतःला लपवत असल्याचे यावरुन दिसतेय. हा फोटो पाहून वाटतेय की, तो आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी बाहेर पडला आहे. पोस्टर शेअर करण्यासोबतच भाईजानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘टायगरची नवीन तारीख दिवाळी 2023 आहे! फक्त तुमच्या जवळच्या मोठ्या स्क्रीनवर.’ हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.
टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट
टायगर 3 हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. जो रॉ एजंट टायगर आणि आयएसआय एजंट झोयासोबत पुढे जाईल. टायगर 3 मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफसोबत इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.