सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका विभागीय मिरज महापालिका कार्यालयाच्या आवारात भानामती केल्याचे साहित्य आढळून आले.जर महापालिकेच्या आवारातच असे प्रकार होत असतील तर ही बाब खूप गंभीर आहे.महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच मिरजेत काही दिवसांपासून भानामतीचे आणि जादूटोण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
याबाबत मिरज परिसरामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी होण्यास अत्यंत गरजेचे आहे.कारण असले प्रकार करुन समोरच्याला त्रास देण्याचे काम विघ्नसंतोषी करत असतात.याकडून महानगरपालिकेने अचूक नजर ठेवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मिरज परिवर्तन समितीने मागणी केली आहे.मनपा अधिकाऱ्यांना फोन लावत असतात लागत नाही तर या प्रकारांची सखोल चौकशी व्हावी.असे मिरज परिवर्तन समितीने मागणी केली आहे.