Monday, August 4, 2025
Homeसांगली१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : तरुणास २२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : तरुणास २२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगली : १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्या प्रकरणी तरुणास न्यायालयाने दोषी ठरवून २२ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. रवी शामराव भोसले (वय ३८ रा. एसटी वर्कशॉप जवळ, मिरज) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना हि फेब्रुवारी २०१९ या वर्षी घडली होती. जादा विशेष जिल्हा व अति सत्र न्यायाधीश डी.एस. हातरोटे यांनी सदरची शिक्षा सुनावली.



याबाबत अधिक माहिती अशी कि, की पीडिता ही बारा वर्षाची होती. पीडिता ही मैत्रिणीकडे गेल्यानंतर आरोपी भोसले याने जबरदस्तीने घरात नेले. त्यावेळी अत्याचार केले. ही गोष्ट कोणाला सांगितली तर आई-वडिलांसह पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेने घाबरून ही बाबात कुटुंबियांना सांगितली नाही. दरम्यान, २० फेब्रुवारी २०१९ रोजी पीडितेच्या पोटात दुखू लागले. त्यावेळी शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यात तपासणीत ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी सखोल चौकशी केली असता पीडितेने सारी हकीकत सांगितली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी महात्मा गांधी पोलिस चौकीत संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पीडितेचा कायदेशीररित्या गर्भपात करण्यात आला.

न्यायवैज्ञनिक प्रयोगशाळेत अहवालही मागविण्यात आला. पोलिसांनी संशयितास अटक केली. घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय पुरावे एकत्रित करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेसह कुटुंबियांचा जबाब, वैद्यकीय अहवाल, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरत २२ वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. देशपांडे-साटविलकर यांनी जोरदार युक्तीवाद केला. आरोपीने केलेला गुन्हा क्रूर स्वरूपाचा असून जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी न्यायालयासमोर युक्तीवाद केला. पैरवी कक्षातील पोलिस अंमलदार अमोल पाटील, प्रल्हाद खोत, रमा डांगे, वंदना मिसाळ, शरद राडे, गणेश वाघ यांनी सरकार पक्षास मदत केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -