Sunday, July 6, 2025
Homeक्रीडाआयपीएल चिअरगर्लला हृदय देऊन बसला हा दिग्गज क्रिकेटपटू

आयपीएल चिअरगर्लला हृदय देऊन बसला हा दिग्गज क्रिकेटपटू


दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर आणि फलंदाज क्लिंटन डी कॉक त्यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे प्रसिद्ध असून त्याच्या फलंदाजीवर अनेक चाहते फिदा आहेत. क्लिंटन प्रसिद्धीपासून दूर राहणारा म्हणून ओळखला जातो. यामुळेच त्यांची लव्हस्टोरी अनेकांना माहिती नाही.


क्लिंटनने २०१५ मध्ये साशा हर्ले हिच्याबरोबर साखरपुडा केला होता आणि २०१६ मध्ये ते विवाहबद्ध झाले. या दोघांची पहिली भेट २०१२ च्या आयपीएल सामन्याच्या वेळी झाली होती. विशेष म्हणजे हा सामना पंजाब लायन्स आणि मुंबई इंडियन यांच्यात झाला होता. साशा आयपीएल मध्ये चिअरलीडर होती. क्लिंटन याने येथेच प्रथम साशाला पाहिले होते.

साशा सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. क्लिंटन डी कॉक साठी चिअर करताना तिला अनेकांनी पाहिलेही असेल. क्लिंटन आणि साशा प्रथम भेटले सोशल मिडीयावरच. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या प्रेमाची परिणीती विवाहात झाली असून हे दोघेही एकमेकांवर खुश आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -