Sunday, December 22, 2024
Homeजरा हटकेदिवाळीत झटपट तयार करा चटपटीत केळीची शेव, जाणून घ्या रेसिपी!

दिवाळीत झटपट तयार करा चटपटीत केळीची शेव, जाणून घ्या रेसिपी!



दिवाळी सण म्हटलं की, प्रत्येकाच्या घरी तयार केला जातो तो म्हणजे फराळ. फराळामध्ये आपण चकल्या, लाडू, चिवडा, करंजी, शंकरपाळ्या, शेव यासारखे पदार्थ तयार करतो. पण हल्ली वेगवेगळ्या प्रकारच्या शेव तयार केल्या जातात. अशीच एक खास शेवची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चटपटीत केळीची शेव कशी तयार करायची हे आज आपण जाणून घेणार आहोत. अतिशय सोपी आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. तर मग जाणून घेऊया केळीची शेव तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि रेसिपी….

– 1/4 कप तांदळाचे पीठ
– एक कप बेसन
– 1 कच्ची केळी (उकडून किंवा किसलेले)
– 1 चमचा आले-लसूण पेस्ट
– 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट
– अर्धा चमचा लिंबाचा रस
– 1 चमचा तेल
– 1 चमचा बेकिंग पावडर
– मीठ चवीनुसार
– तळण्यासाठी तेल.

अशी तयार करा केळीची शेव –
केळीची शेव तयार करणसाठी सर्वातआधी एका बाऊलमध्ये तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि बेकिंग पावडर, एक चमचा तेल, अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 कच्ची केळी (उकडून किंवा किसलेले), 1 चमचा आले-लसूण पेस्ट, 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाका. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्या. पीठ घट्ट मळायचे आहे. आता शेव मोल्डमध्ये टाकू पीठाचा गोळा टाकून गरम तेलामध्ये शेव टाका. कुरकुरीत होईपर्यंत शेव तळून घ्या. चहा किंवा कॉफीसोबत तुम्ही ही शेव खाऊ शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -