राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. शिवसेनेसोबत (Shivsena) बंड करुन एकनाथ शिंदेंनी (Eknath shinde) नवा गट स्थापन केला. या गटाला देवेंद्र फडणवीसांची (Devendra fadanvis) साथ मिळाली आणि दोघांनी मिळून नवे सरकार स्थापन केले. मात्र आता भाजपच्या (BJP) साथीने मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे भाजपचेचे नेते फोडत असल्याचे दिसतेय. मुंबई महापालिका निवडणुकांच्या (Bmc Election 2022) तोंडावर शिंदे गटाने (Shinde group) भाजपलाच खिंडार पाहायला सुरुवात केली आहे. भाजपच्या एका दिग्गज नेत्याने आता पत्नीसह शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे शिंदे फडणवीस सरकारमध्ये आपसाताच रस्सीखेच सुरु आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
भाजपचा ‘हा’ नेता शिंदे गटात
मुंबई पालिका निवडणुकीची लगबग सध्या सुरु आहे. मुंबईत सत्ता स्थापन करता यावी यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न केले जात आहे. अशा वेळी शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. मुंबईत शिंदे गटाने भाजपचा महामंत्रीच फोडला आहे. उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव (Ram Yadav) आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव (Rekha yadav) यांनी आता भाजपला सोडचिठ्ठी देत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) याच्या उपस्थितीत त्यांनी बाळासाहेबांच्या या शिवसेनेत प्रवेश केलाय. या यादव दाम्पत्याचा शिंदे गटात प्रवेश हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारमध्ये अंतर्गत वाद?
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 40 आमदार सोबत घेतले. तसेच 10 अपक्ष आमदारांच्या साथीने ते महाविकास आघाडी सरकारपासून वेगळे झाले. त्यांनी अभूतपूर्व असे बंड केले. शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीने राज्यात नवे सरकार स्थापन केले. 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले. सुरुवातीला या दोन्हीही नेत्यांमध्ये सर्व काही सुरळीत सुरु होतं. मात्र आता सरकारमध्ये अंतर्गत वाद असल्याचे समोर येत आहे. पोलिसांच्या बदल्यांवरुन देखील या गटामध्ये वाद असल्याचे समोर आले होते. तसेच केसरकर आणि राणे यांच्यातही वाद असल्याचे पाहायला मिळाला. यानंतर आता शिंदे गट भाजपचेच नेते फोडत असल्याने या शिंदे आणि फडणवीसांमधील वाद वाढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.