ताजी बातमी ऑनलाईन टीम
T20 वर्ल्डकप 2022 मधील भारताचा 2 सामना आज नेदरलँडसोबत होता. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ही मॅच झाली. या मॅचमध्ये भारतीय संघाने 56 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ 20 षटकांत केवळ 123 धावाच करू शकला. संघाकडून सर्वाधिक धावा मधल्या फळीतील फलंदाज टिम प्रिंगलने केल्या. प्रिंगलने 15 चेंडूंचा सामना केला आणि एका चौकार आणि षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या. दुसरीकडे, भारतीय संघासाठी या सामन्यात भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांना अनुक्रमे दोन विकेट घेतल्या.
सुपर-12 राउंडच्या आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँडचा 56 धावांनी पराभव केला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 गडी गमावून 179 धावा केल्या. रोहित शर्माने 53 धावा केल्या. त्याचवेळी विराट कोहलीने 44 चेंडूत 62 धावा केल्या आणि सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी केली. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 123 धावा करू शकला. नेदरलँडकडून टीम प्रिंगलने 20 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी मोहम्मद शमीला एक विकेट मिळाली.
पॉइंट्स टेबलवर भारत पहिल्या क्रमांकावर
या विजयासह टीम इंडिया सुपर-12 फेरीच्या ग्रुप-2 मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. भारताचे दोन सामन्यांत दोन विजयांसह चार गुण आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा संघ दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता भारताचा सामना 30 ऑक्टोबरला पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.