ताजी बातमी ऑनलाईन टीम
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार iocl.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतो. उमेदवारांनी हे लक्षात घ्या की अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
आवश्यक पात्रता
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच पदवी किमान ५० टक्के गुण आवश्यक. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना किमान 45 टक्के गुण असणे अनिवार्य. इतर शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी उमेदवारांना भरतीची अधिसूचना पाहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 265 शिकाऊ पदे भरण्यात येणार आहेत. तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचनेवर दिलेली माहिती वाचण्याचा सल्ला दिला जातो. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांची वयोमर्यादा 18 ते 24 वर्षे दरम्यान असावी.
निवड प्रक्रिया (Selection Process)
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अप्रेंटिस भरतीमधील पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. त्यामुळे जे उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असतील त्यांनीच अर्ज करावा असा सल्ला दिला जातो. निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. लेखी परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील आणि त्यात प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतील. यातील एक योग्य पर्याय निवडावा लागेल.
असा करा अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवार https://apprenticeshipindia.org/candidates-registration या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया अधिकृत वेबसाइटवरील अधिसूचना तपासावी.
नोटिफिकेशन कसे डाउनलोड करावे?
सर्वप्रथम https://iocl.com/apprenticeships अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
येथे अधिकृत वेबसाइटच्या भरती विभागात जा.
मुख्यपृष्ठावर 265 ट्रेड अप्रेंटिसेसच्या सहभागासाठी अधिसूचना लिंकवर क्लिक करा.
भरतीची अधिसूचना PDF नवीन विंडोमध्ये उघडेल.
हे अधिसूचना PDF डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी जतन करा.