Monday, July 7, 2025
Homeक्रीडान्यूझीलंड-बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, दिग्गजांना विश्रांती, ‘हा’ खेळाडू असणार कॅप्टन..

न्यूझीलंड-बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, दिग्गजांना विश्रांती, ‘हा’ खेळाडू असणार कॅप्टन..

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळत असतानाच, ‘बीसीसीआय’ने न्यूझीलंड व बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. टी-20 वर्ल्ड कपनंतर भारताचा संघ प्रथम न्यूझीलंड व नंतर बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंडमध्ये 3 टी-20 आणि 3 वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे, तर बांग्लादेशमध्ये भारतीय संघ वनडे व कसोटी मालिका खेळणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ‘बीसीसीआय’ने कॅप्टन रोहित शर्मासह विराट कोहली, लोकेश राहुल, मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याकडे टी-20 संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तसेच, शिखर धवनकडे वन-डेचं नेतृत्व कायम ठेवलं आहे. याआधीही हार्दिकनं दक्षिण आफ्रिका व आयर्लंड दौऱ्यात कर्णधारपद सांभाळलं होतं.

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 संघ – हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), ईशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

वन डे संघ – शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप सेन, अर्शदीप, शार्दूल ठाकूर, दीपक चहर.

न्यूझीलंड दौरा

18 नोव्हेंबर, पहिली टी20 – वेलिंग्टन
20 नोव्हेंबर, दुसरी टी20 – माऊंट माँगानुई
22 नोव्हेंबर, तिसरी टी20 – नेपियर

वन डे मालिका

25 नोव्हेंबर, पहिली वन डे – ऑकलंड
27 नोव्हेंबर, दुसरी वन डे – हॅमिल्टन
30 नोव्हेंबर, तिसरी वन डे – ख्राईस्टचर्च
बांग्लादेश दौऱ्यात वरिष्ठांचे पुनरागमन

बांग्लादेश दौऱ्यासाठी मात्र रोहितसह इतर वरिष्ठ खेळाडू पुन्हा एकदा भारतीय संघात दिसणार आहेत. 4 ते 26 डिसेंबरदरम्यान टीम इंडिया बांग्लादेशसोबत 3 वन-डे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

बांगलादेश दौऱ्यासाठी वन डे संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.

कसोटी संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केएस भरत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -