Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानआता 'ब्लू टिक' मिळणार नाही मोफत, मोजावे लागणार पैसे, एलन मस्क यांचा...

आता ‘ब्लू टिक’ मिळणार नाही मोफत, मोजावे लागणार पैसे, एलन मस्क यांचा मोठा निर्णय

टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या (Twitter) खरेदीनंतर अनेक नवे बदल केले आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे ‘ब्लू टिक’ (Blue Tick ) सबस्क्रिप्शनसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे नवीन मालक एलन मस्क यांनी ट्विटरवर ‘ब्लू टिक’ची किंमत जाहीर केली आहे.

एलन मस्क यांच्या घोषणेनुसार, ट्विटरवरील ‘ब्लू टिक’ची किंमत प्रति महिना 8 डॉलर्स (660 रुपये) असेल. ब्लू टिकसाठी किती पैसे मोजावे लागणार याविषयी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती.

काय म्हणाले एलन मस्क?
एलन मस्क यांनी सांगितले, की ट्विटरवर ब्लू टिकसाठी 1600 रुपये नाही. तर 8 डॉलर म्हणजेच जवळपास 660 रुपये मोजावे लागतील. लेखक Stephen King यांनी एक ट्वीट केले होते. त्यांनी लिहिले होते की, ‘ब्लू टिकसाठी 1600 रुपये? हे बकवास आहे. उलट त्या लोकांनी मला पे केले पाहिजे.’ त्यांच्या या ट्वीटवर एलन मस्क यांनी रिप्लाय देत ब्लू टिकसाठीची रक्कम जाहीर केली आहे.

एलन मस्क म्हणाले, ‘आपल्याला काही पद्धतींनी बिल भरावे लागणार आहेत. ट्विटर पूर्णपणे जाहिरातींवर विश्वास ठेवू शकत नाही. 8 डॉलरविषयी तुमचे मत काय आहे? म्हणजेच ब्यू टिकसाठी कंपनी चार्ज करण्याची तयारी करत आहे. मात्र किंमत थोडी असेल.’

यापूर्वीच्या रिपोर्टमध्ये काय म्हटले होते?
मागील रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की , Twitter चे पेड ब्लू टिक फक्त Twitter Blue मेंबर्ससाठी असेल, जी सब्सक्रिप्शन आधारित सर्व्हिस आहे. ट्विटर ब्लूचे सब्सक्रिप्शन घेतल्यानंतर, यूझर्सला ट्विट एडिटसह अनेक विशेष वैशिष्ट्ये मिळतात. असे म्हटले जात आहे की ज्यांचे अकाउंट आधीच व्हेरिफाय आहे, त्यांना 90 दिवसांच्या आत ट्विटर ब्लूचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल, अन्यथा प्रोफाइलमधून ब्लू टिक काढून टाकले जाईल.

एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी नुकतीच ट्विटर खरेदी केली आहे. त्यानंतर त्यांनी ट्वीट करून म्हटले होते की, आता चिमणी मुक्त झाली आहे. यानंतर पासून ते ट्विटरसंदर्भात नवनवीन निर्णय घेत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी काढून टाकले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -