Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटकचे राज्यपाल शुक्रवारी कोल्हापुरात

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटकचे राज्यपाल शुक्रवारी कोल्हापुरात

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे शुक्रवारी (दि. 4) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सीमाभागातील नऊ जिल्हाधिकाऱ्यांकडून सीमाभागातील विविध प्रश्नांसंदर्भात ताराबाई पार्क येथील रेसीडेन्स क्लब येथे सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित आंतरराज्य समन्वय बैठकीत आढावा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार ही बैठक होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मंगळवारी या दौऱ्याच्या अनुषंगाने नियोजनाच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

कर्नाटकचे राज्यपाल गेहलोत हे गुरुवारी (दि. 3) रात्री कोल्हापुरात दाखल होणार आहेत. तर महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी हे शुक्रवारी (दि. 4) सकाळी येण्याची शक्यता आहे. यावेळी दोन्ही राज्यपाल सीमाभागातील 9 जिह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, गुलबर्गा, बिदर या जिह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुणे विभागीय आयुक्त सौरभ रावही उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून अलमट्टी धरण, किटवडे धरण, लम्पी आजार, सीमा भागातून येणारे हत्ती, गर्भलिंग निदान चाचणी आदी मुद्दे मांडले जाणार आहेत.

दरम्यान, मंगळवारी या दौऱ्यांच्या अनुषंगाने नियोजनाच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यांत कोणावर कोणती जबाबदारी राहील याबाबतचे नियोजन करुन त्यानुसार नियुक्त्यांचे आदेश काढण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -