Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : सातवे येथील ऊसतोड मजूराचा फडातच मृत्यू

Kolhapur : सातवे येथील ऊसतोड मजूराचा फडातच मृत्यू

सातवे ता. पन्हाळा येथील लालासो काटे ( वय ३३ ) या ऊसतोड मजूराचा प्रकृती अचानक बिघडल्याने फडातच मृत्यू झाला असून याबाबतची नोंद कोडोली पोलीसात झाली आहे.
लालासो हा ऊस तोडण्यास आज शुक्रवार दि.४ रोजी सकाळी गेला असताना त्याची अचानक तब्येत बिघडल्याने तो झाडाखाली विश्रांतीसाठी झोपला होता त्याच अवस्थेत अचानक जागेवरच त्याचा मृत्यू झाला.

काही वेळानंतर त्याच्यासोबत असणारे अन्य ऊसतोड कामगार तब्येत कशी आहे याची चौकशी करण्यासाठी गेले असता तो मूर्त अवस्थेत दिसून आला. याबाबतची वर्दी धनाजी काटे यांनी कोडोली पोलीसात दिली आहे. कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -