Thursday, August 7, 2025
Homeब्रेकिंगसर्वात मोठी बातमी:शिंदे गट फुटणार? दोन आमदार नाराज ?

सर्वात मोठी बातमी:शिंदे गट फुटणार? दोन आमदार नाराज ?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरु असल्याची चर्चा होती.शिंदे गटातील दोन आमदारांमधील वाद आता चव्हाट्यावर आल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यात दोन आमदारांची नाराजी उघडपणे पहायला मिळाली आहे. यामुळे शिंदे गटात फुट पडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.पक्ष नेतृत्वावरील नाराजीचे कारण पुढे करत ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या शिंदे

गटालाही आता नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौ-यात शिंदे गटातील आमदारांची नाराजी उघडपणे पहायला मिळली.

शिंदे समर्थक या दोन आमदारांच्या नाराजी नाट्याची जोरदार चर्चा होत आहे.नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचे दोन्ही गट वेगवेगळ्या ठिकाणी शिंदेच्या

स्वागताला उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी आमदार सुहास कांदे यांनी जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरुन सुहास कांदे नाराज आहेत.

पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना विश्वासात घेतले जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर मुख्यंमत्र्यांच्या दौ-यात ही नाराजी स्पष्टपणे दिसून आली.ठाकरेंच्या नेतृत्वावर नाराज

होऊन एकनाथ शिंदे तब्बल 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -