Sunday, August 10, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : पूर्वीचे भांडण विकोपाला गेले, अन् एकमेकांवर त्यांनी चाकूने वार केले

Kolhapur : पूर्वीचे भांडण विकोपाला गेले, अन् एकमेकांवर त्यांनी चाकूने वार केले

पूर्व वैमनस्यातून आणि दिलेली तक्रार मागे घेण्याच्या सांगण्यावरून दोन गटात झालेल्या मारामारीत एका तरुणाच्या पोटात चाकूने वार करण्यात आल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरां वाजता लक्षतीर्थ वसाहत मधील शाहू चौक येथे घडली. यामध्ये ऋषिकेश रवींद्र नलवडे, वय २५ राहणार नरसिंह कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटातील एकावर चाकूने केलेले हल्ल्यात एक तरुण जखमी झाला आहे. अभिषेक विजय उगवे, वय २५, राहणार जय शिवराय गल्ली, शाहू चौक, लक्षतीर्थ वसाहत असे या जखमीचे नाव आहे.

या प्रकरणी परस्परविरोधी तक्रार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.ही घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. फिर्यादी चंद्रकांत गोविंद खोंदल, २६ राहणार गणेश नगर, गुंडे अबा तालीम शेजारी शिंगणापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अभिषेक उर्फ अंकुश विजय उगावे, वय २५ राहणार शाहू चौक, लक्षतीर्थ वसाहत, वैभव उर्फ विवेक विनोद विभुते, राहणार लक्षतीर्थ वसाहत, आणि मोहसीन दिल्यावर महात, वय ३३ दत्त कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत आरोपी अभिषेक उगवे यांनी ऋषिकेश नलवडे याला पूर्वीच्या भांडणातून जीवे मारण्याची धमकी देत पोटात चाकूने वार करून जखमी केल्याची फिर्याद दिली आहे.

यामध्ये आरोपी वैभव विभूते व मोहसीन महात हे देखील सहभागी होते. त्यानुसार या तिघावर गुन्हा दाखल झाला आहे. तर फिर्यादी अभिषेक विजय उगवे, राहणार जय शिवराय गल्ली, शाहू चौक, लक्षतीर्थ वसाहत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी ऋषिकेश रवींद्र नलवडे, वय २४ राहणार नरसिंह कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत याने पूर्वीच्या भांड्नावरून आणि दिलेली तक्रार मागे घेण्यास सांगून फिर्यादी अभिषेक उगवें यास शिवीगाळ केली तसेच आपल्याकडे असणाऱ्या चाकूने फिर्यादीवर वार केला.यामध्ये फिर्यादी अभिषेक यांच्या हाताला दुखापत झाली आहे. याप्रकरणी अभिषेक उगवें याने दिलेले फिर्यादीवरून आरोपी ऋषिकेश नलवडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जखमी ऋषिकेश नलवडे आणि अभिषेक उगवेंवर सीपीआर मध्ये उपचार करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -