ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : सैन्यदलातील अग्नीवीर भरतीसाठी तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, २२ नोव्हेंबरपासून कोल्हापुरात सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी तब्बल ९८ हजार उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. राजाराम कॉलेजचे मैदान आणि शिवाजी विद्यापीठातील मैदानावर भरती प्रक्रियेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने दिली.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीवीर भरतीसाठी सरुवातीला काही राजकीय पक्ष आणि तरुणांच्या संघटन विराध दशावला, मात्र भरती प्रक्रिया सुरू होताच, त्याला तरुणांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. २२ नोव्हेंबरपासून कोल्हापुरात होणाऱ्या अग्नीवीर सैन्य भरतीसाठी ९८ हजार उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, बेळगावसह गोव्यातील उमेदवारांचा यात समावेश आहे. उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे भरती प्रक्रिया ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
एकाच दिवशी उमेदवारांची गर्दी होऊ नये, यासाठी तालुकानिहाय रोज पाच हजार उमेदवारांना भरतीसाठी बोलवले जाणार आहे. राजाराम कॉलेजच्या मैदानावर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. दोन्ही ठिकाणी उमेदवारांसाठी पाणी आणि शौचालयांची व्यवस्था केली जाणार आहे. व्हाईट आर्मी कडून उमेदवारांसाठी अन्नछत्र चालवले जाणार आहे, अशी माहिती आयोजकां दिली.