Monday, December 23, 2024
HomeमनोरंजनDrishyam 2 Leaked : ‘दृश्यम 2’रिलीज होताच इंटरनेटवर झाला लीक, कोट्यवधीचे झाले...

Drishyam 2 Leaked : ‘दृश्यम 2’रिलीज होताच इंटरनेटवर झाला लीक, कोट्यवधीचे झाले नुकसान!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण तब्बू आणि श्रिया सरन यांची मुख्य भूमिका असलेला ‘दृश्यम’ चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘दृश्यम 2’ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवून दमदार कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. पण अशामध्ये हा चित्रपट रिलीज झाल्याच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाच्या निर्मात्यांना धक्का बसला आहे. कारण ‘दृश्यम 2’ चित्रपट लीक झाला आहे.



अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षक खूप उत्सुक होते. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहून तर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. अखेर आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचा पहिला भाग लोकांना जेवढा आवडला तेवढाच प्रतिसाद ते दुसऱ्या भागाला देखील देत आहे. पण याच दरम्यान या चित्रपटाबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण हा चित्रपट रिलीज होताच लीक झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Tamilrockers, Movierulz आणि Filmyzilla सारख्या साइट्सने अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ ऑनलाइन लीक केला आहे.

चित्रपट लीक झाल्याचे कळल्यानंतर निर्माते खूपच नाराज दिसत आहेत. त्याचसोबत या चित्रपटामध्ये काम करणारे कलाकार देखील नाराज झाले आहेत. या चित्रपटाच्या ऑनलाइन लीकनंतर त्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम दिसून येईल, असे सांगितले जात आहे. तसा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असे सांगितले जात आहे. पण अशाच चित्रपट लीक झाल्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसून येऊ शकतो. दरम्यान, ‘दृश्यम 2’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जादू करणार असल्याचे दिसून येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून 4.50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -