ताजी बातमी ऑनलाईन टीम
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील श्रध्दा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहे. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावालने तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. याप्रकरणातील आरोपी आफताबला कठोर शिक्षा देत श्रद्धाला न्याय मिळवू द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्या प्रकरणावर सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्व जण संताप व्यक्त करत आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर लवकरच चित्रपट येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे.
बॉलिवूड चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मनीष एफ सिंग यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा करून चित्रपटसृष्टीला आश्चर्याचा धक्का दिला आहे. या चित्रपटाचे नाव देखील ठरवण्यात आले आहे. मनीष एफ सिंग यांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, त्यांचा हा चित्रपट श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणावर आधारित नसून त्या घटनेवर प्रेरित असेल. त्यांनी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू केले आहे. असं या चित्रपटाचं नाव ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
मनीष एफ सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांचा चित्रपट लव्ह जिहादवर असेल आणि निष्पाप मुलींना जाळ्यात अडकवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या षडयंत्रांचा पर्दाफाश या चित्रपटाद्वारे करण्यात येणार आहे. त्यांनी आपल्या टीमला चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करण्यास सांगितले आहे. वृंदावन फिल्म्सच्या बॅनरखाली मनीष एफ सिंग या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘Who Killed Shraddha Walker’ हे या चित्रपटाचे वर्किंग टायटल त्यांनी ठेवले आहे. त्यांच्या टीमने दिल्लीच्या आजूबाजूच्या जंगलांच्या व्हिडिओ क्लिपचे संशोधन आणि संकलन करण्याचे काम सुरू केले आहे. शूटिंगसाठी ते लोकेशनही शोधत आहेत. या चित्रपटात कोण-कोणते कलाकार काम करणार आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.