Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरशिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्ह व लेटरहेडचा गैरवापर

शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्ह व लेटरहेडचा गैरवापर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवाजी विद्यापीठाचे बोधचिन्ह आणि परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या लेटरहेडचा गैरवापर करुन विभागाच्या कामकाजाबद्दल संभ्रमावस्था निर्माण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अजितसिंह नारायणराव जाधव (वय 52, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी दिली. जुलै 2022 पासून हा प्रकार सुरु असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.



याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी, तसेच परीक्षा विभागाच्या कामकाजाबद्दल संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी अज्ञाताने विद्यापीठाचे बोधचिन्ह आणि परीक्षा विभागाच्या लेटरहेडचा गैरवापर केला आहे. जुलै 2022 पासून हा प्रकार सुरू असून, अज्ञाताने परीक्षा विभागाच्या लेटरहेडवर चुकीचा मजकूर लिहून तो सोशल मीडियात व्हायरल केला. विद्यापीठाची बदनामी आणि फसवणूक केल्याबद्दल परीक्षा विभागाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी शुक्रवारी रात्री अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -