ताजी बातमी ऑनलाईन टीम
मकतुक तडकोड वय वर्षे १० राहणार मरेवाडी तालुका धारवाड हा आज सकाळी पाच वाजता आपल्या आई वडीला सोबत हजरत ख्वाजा मिरासाहेब दर्गा येथे दर्शनासाठी आला होता. तो साडेपाच वाजताच्या सुमारास पालकांची नजर चुकूवून रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी गेला.त्याला परत येण्याचा रस्ता न समजल्याने चुकून पंढरपूर रोडच्या दिशेने गेला. वाहतुक पोलीस रवी कोरे व राहूल सातपूते हे गांधी चौक येथे कर्तव्यात उपस्थित असताना सदर मुलगा त्यास थांबलेला दिसला त्यांनी त्यांची विचारपूस केली असता त्यास कन्नड भाषा येत होती.
स्थानिक दुभाषाच्या मदतीने त्याची विचारपूस करता त्यांने आपण मरेवाडी ता.धारवाड येथून आपल्या आई वडीला बरोबर देवदर्शनासाठी आलो असता.रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी आलो आणि रस्ता चुकुन इकडे आल्याचे सांगितले.पोलिस रवी कोरे आणि राहू ल सातपूते यांनी त्यास घेऊन हजरत ख्वाजा मिरासाहेब दर्गाह परिसरात त्यांच्या पालकांचा शोध घेऊन सदर अल्पवयीन मुलास सुखरूप पणे त्याच्या आई वडीलांच्या ताब्यात दिले.त्याच्या का चांगल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.