Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: प्रेमी युगुलांची निर्जनस्थळी लुटमार

कोल्हापूर: प्रेमी युगुलांची निर्जनस्थळी लुटमार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गिरोली घाट, वाघबीळ, कात्यायनी, पन्हाळ्याच्या निर्जनस्थळी जाणाऱ्या प्रेमी युगुलांना लुटण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येते. वाघबीळ घाटात मित्रासोबत आलेल्या एका तरुणीच्या विनयभंगाचाही प्रकार संशयिताकडून घडला. निर्जनस्थळी जाण्यापूर्वी अशा धोक्यांचा विचार करण्याची गरज आहे.


वाघबीळ घाटातील पडवळवाडी परिसरात काही दिवसांपूर्वी एक प्रेमी युगल थांबले होते. दोघे एकांतात गप्पा मारत असताना संशयित त्याठिकाणी आला. त्याने दोघांच्याही अजाणतेपणी
व्हिडीओ बनवला. यानंतर यातील तरुणीचा मोबाईल चोरून त्यावरून तिच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर अश्लील मेसेज पाठवून बदनामीची धमकी दिली. तसेच तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी करवीर पोलिसांत गुन्हा दाखल असून संशयिताला अटकही करण्यात आली संशयित हा खोदाईची कामे करतो. तो मूळचा विजापूर जिल्ह्यातील इंडी गावचा असल्याचे तपासात पुढे आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -