Monday, July 7, 2025
Homeतंत्रज्ञानPan Card : आता लाड नाही, प्राप्तिकर खात्याची थेट अॅक्शन.. तुमचं पॅन...

Pan Card : आता लाड नाही, प्राप्तिकर खात्याची थेट अॅक्शन.. तुमचं पॅन कार्ड होईल रद्द

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नवी दिल्ली : प्राप्तिकर खात्याने अनेक संधी दिल्यानंतरही तुम्ही हे काम केले नसेल तर त्याचा फटाका तुम्हाला बसू शकतो. तुमचं पॅनकार्ड ही रद्द होऊ शकतं. अर्थात त्यासाठी करदात्यांना आणि सर्वच नागरिकांना पुरेसा वेळ देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून त्यासंबंधीची माहिती आयकर विभाग देत
आहे.



पॅनकार्ड हे भारतीय नागरिकांच्या आर्थिक घाडमोडींची जंत्रीच आहे. तर आधारकार्ड हा एक महत्वाचा दस्ताऐवज आहे. हे दोन्ही कार्ड परस्परांशी लिंक करणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे.

आयकर विवरण पत्र भरण्यासाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी केंद्र सरकारने आधार कार्डशी पॅनकार्डची जोडणी करणे आवश्यक केले आहे. केंद्र सरकारने या जोडणीसाठी आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ ही दिली आहे. आता मार्च 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. आताची मुदतवाढ ही सशुल्क आहे. त्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहे. कारण यापूर्वी आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख होती.

पण इंटरनेट समस्या आणि कोरोनाची कारणे देत ही अंतिम मुदत (Last Date) पुढे ढकलण्यात आली होती. 31 मार्च ते 30 जून 2022 पर्यंत आधार कार्ड पॅन सोबत जोडण्यासाठी सध्या 500 रुपये दंड वसूल करण्यात येत होता.

तर 30 जून नंतर आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांना 1000 रुपये मोजावे लागणार आहेत. ही मुदत ही 31 मार्च 2022 रोजी पर्यंत आहे. त्यानंतर आधारशी लिंक न करण्यात आलेले पॅनकार्ड आपोआप रद्द होतील. यासंबंधी आयकर विभागाने एक ट्विट केले आहे. त्यात 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड-आधार कार्डशी न जोडल्यास नागरिकांचे पॅनकार्ड रद्द करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -