Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरKolhapur Crime : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या विकृत शिक्षकाला 23 नोव्हेंबरपर्यंत...

Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या विकृत शिक्षकाला 23 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणेमध्ये अल्पवयीन लैंगिक शोषण करून घृणास्पद कृत्य करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 23 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. नामदेव मारुती पोवार असे या विकृत शिक्षकाचे नाव असून त्याच्याविरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नामदेव मुलींच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक होता. विद्येच्या प्रांगणात असे घृणास्पद कृत्य केल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे.

ग्रामस्थांमधून संतापाचा उद्रेक झाल्यानंतर जिल्हा परिषदेने त्यांची चंदगडला बदली केली असली, तरी त्या ठिकाणी असा विकृत शिक्षक घेण्याला कडाडून विरोध होत आहे. पन्हाळा पोलिसांनी नामदेवला रात्री साडे अकराच्या सुमारास घरातून उचलत अटकेची कारवाई केली. पालकांकडून फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या विकृतावर गेल्या आठवडाभरापासून पाळत ठेवून स्टिंग ऑपरेशन करून घृणास्पद कृत्य समोर आणण्यात आले. त्यानंतर नामदेवविरोधात चौकशी सुरु केली होती. मात्र, मुलीची बाजू असल्याने अनेक पालक तक्रार करण्यास धजावत नव्हते. मात्र, काही पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई करण्यात आली. पोलिस अधिकारी शैलेजा पाटील यांनी वर्गाची पाहणी करत मुख्याध्यापकांकडेही चौकशी केली.

दरम्यान, कोल्हापूर शहराच्या वेशीवर असणाऱ्या एका गावातून अत्यंत घृणास्पद आणि बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सप्टेबर महिन्यात समोर आली होती. विकृत बापाने पोटच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीशी गेल्या दोन वर्षांपासून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याची घटना समोर आली आहे. संबंधित पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आल्यानंतर हा धक्कादायक समोर आला. याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीशी बापाने 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. संबंधित मुलीला दवाखान्यात तपासणीसाठी गेल्यानंतर गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पीडिताने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरु केली आहे. पोलिसांनी विकृत बापाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -