गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरकर (Kolhapur) कडाक्याच्या थंडीने गारठले आहेत.सहा वर्षानंतर पहिल्यांदाच पाऱ्याची निश्चयांची घसरण झाल्याने कोल्हापूरकरांना हुडहुडी भरलेली आहे. राज्यसह कोल्हापुरात देखील थंडीची लाट आलेली आहे. या थंडीमुळे कोल्हापूरकर अक्षरशः गारठलेले आहेत. काही जण थंडीचा (Winter Season) आनंद घेण्यासाठी सकाळी सकाळी रंकाळा परिसरात व्यायाम करण्यासाठी जात आहेत. तर काहीजण सकाळच्या कोवळ्या उन्हात आनंद घेण्यासाठी उद्यान परिसरात जमत आहेत.
कोल्हापूरसह परिसरात किमान तापमान 14 .8 अंश सेल्सिअस पर्यंत आलं होतं. गेल्या सहा वर्षातील ही निश्चयांकित नोंद असून दिवसेंदिवस पारा घसरत असल्याने त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम जाणवत आहे. कोल्हापूर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढत असल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. कारण या थंडीत या थंडीचे जसे फायदे आहेत तसे तोटेही सहन करावे लागतात.
जसं ‘आला पावसाळा आरोग्य सांभाळा’ अगदी तशीच गत आता ‘आला हिवाळा आपलं आरोग्य सांभाळा’ असं म्हणण्याची वेळ आलीय. एरवी रात्रीपर्यंत गर्दीने फुललेल्या शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळ सायंकाळ नंतर जाणवत नाही. सध्या कोल्हापूरकर या थंडीपासून वाचण्यासाठी गरम आणि उबदार कपड्यांचा वापर तर करत आहेतच पण शेकोटीचाही आनंद घेत आहेत.






