तरुणाईच्या गळ्यातील ताईत आणि लाखो हृदयांवर जादू करणारा बॉलिवूडचा (Bollywood) सर्वोत्कृष्ट गायक अरिजित सिंग (Singer Arijit Singh) नेहमीच चर्चेत असतो. कधी तो त्याच्या गाण्यामुळे तर कधी तो त्याच्या कॉन्सर्टमुळे चर्चेत असतो. अरिजितने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून यशाची अनेक शिखरे पार केली आहेत. आजही बॉलिवूडच्या हिट चित्रपटात अरिजित सिंगचे एकतरी गाणं असतं. त्याने आतोपर्यंत गायलेली प्रत्येक गाणी सुपरहिट (Arijit Singh Superhit Song) ठरली आहेत. अरिजित सिंगचे कॉन्सर्ट (Arijit Singh Concert) म्हटले की त्याला तुफान गर्दी होते. या कॉन्सर्टचे तिकिट (Arijit Singh Concert Ticket) सध्या चर्चेत आले आहे.
अरिजित सिंगच्या क्रेझबद्दल बोलावे तेवढं कमी आहे. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण त्याचे चाहते असून त्याच्या नवनवीन गाण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. इतकंच नाही तर अरिजितच्या कॉन्सर्टमध्ये प्रचंड गर्दी असते. चाहत्यांचे प्रेम मिळवण्याव्यतिरिक्त त्याने आपल्या गाण्यांच्या माध्यमातून पैसे देखील कमावले आहेत. केवळ चित्रपटच नाही तर अरिजितला जगभरातील लाइव्ह गिग्समध्येही त्याचा वाटा मिळतो. अरिजित सिंगरने 2019 च्या फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100 यादीतही स्थान मिळवले आहे. आता अरिजितची कॉन्सर्टही चांगलीच चर्चेत आली आहे.
अरिजितचे पुण्यामध्ये कॉन्सर्ट होणार आहे. या कॉन्सर्टची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या कॉन्सर्टसाठी असणाऱ्या तिकीटाबद्दल चांगलीच चर्चा होत आहे. अरिजित सिंगच्या लोकप्रियतेचे प्रमाण पाहता त्याच्या शो आणि कॉन्सर्टच्या आयोजकांना तिकीट पाहिजे त्या किमतीत विकणे सोपे आहे. अरिजितच्या पुणे कॉन्सर्टसाठी तिकीटाची किंमत 16 लाखांवर जात आहे. यामुळे त्याचा चाहतावर्ग देखील आश्चर्यचकित झाला आहे.
अरिजित सिंग पुढील वर्षी जानेवारीत पुण्यातील द मिल्स येथे एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणार आहे. या कॉन्सर्टच्या तिकीट पाहून अरिजितचे चाहते चक्कीत झाले आहेत. या कॉन्सर्टमध्ये स्टँडिंग एरियाची किंमत 999 रुपयांपासून सुरू होते आणि एरिनामधील प्रीमियम लाउंजसाठी 16 लाख रुपयांपर्यंत जाते. ट्विटर वापरकर्त्यानुसार, प्रीमियम लाउंज 1, ज्याची किंमत 16 लाख रुपये आहे. 40 लोक अमर्यादित जेवण (3 व्हेज, 3 नॉन-व्हेज स्टार्टर्स, 2 व्हेज, 2 नॉन-व्हेज मेन कोर्स आणि 1 इंटरनॅशनल डेझर्ट) यासोबत वाईन आणि बिअरही मिळेल. सोशल मीडियावर आता या कॉन्सर्टच्या तिकीटावर त्याचे चाहते कमेंट्स करत ‘आमचे तुझ्यावर प्रेम आहे पण हे परवडणार नाही.’, असे बोलत आहेत.
अरिजित सिंगचे 2005 मध्ये ‘फेम गुरुकुल’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर त्याच्या करिअरची सुरुवात झाली. परंतु 2013 मध्ये ‘तुम ही हो’ आणि ‘चाहूं में या ना’ या गाण्यांच्या रिलीजनंतर त्याला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली. अरिजित हा एक राष्ट्रीय पुरस्कार आणि 6 फिल्मफेअर पुरस्कारांचा विजेता आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी तो एक आहे. आज फक्त भारतात नाही तर जगभरात त्याचा चाहतावर्ग आहे.