Sunday, July 27, 2025
HomeसांगलीSangli : कृष्णेचा पाणीकलश घेऊन जतचे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना

Sangli : कृष्णेचा पाणीकलश घेऊन जतचे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना

जत तालुक्याच्या आठ तलावातील पाणी घेऊन संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक तुकाराम बाबा महाराज यांच्या सह बावीस जणांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सांगली येथे
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना भेटून निवेदन दिले. तेथून कृष्णाघाटावर पायी जात कृष्णेचे पाणी घेऊन सायंकाळी शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झाले आहे. या शिष्टंडळाचे नेतृत्व तुकाराम बाबा महाराज व ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे हे करीत आहेत.

दरम्यान, शिष्ठमंडळ मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचताच सांगली पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिष्टमंडळाने मुंबईला जाऊ नये, यासाठी मनधरणी केली. मात्र, शिष्टमंडळ पोलिसांचे म्हणणे ऐकून घेऊन सायंकाळी मुंबई कडे रवाना झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -