Thursday, August 7, 2025
Homeसांगलीमिरजेत चोरट्याने चक्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांच्या अनामत रकमेवरच मारला डल्ला

मिरजेत चोरट्याने चक्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांच्या अनामत रकमेवरच मारला डल्ला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मिरजेत चोरट्याने चक्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांच्या अनामत रकमेवरच डल्ला मारल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मिरजेतील शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार येथे मिरज तालुक्यातील छत्तीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशित पत्र स्वीकारण्याचे काम निवडणूक प्रशासनाकडून सुरू असून यादरम्यान विचित्र घटना समोर आली आहे चक्क चोरट्याने उमेदवारांची भरलेली अनामत रक्कमच लंपास केल्याने मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे .

शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांकडून भरण्यात आलेली अनामत रक्कम 7200 रुपये इतकी बेडग विभागाच्या टेबलला असलेल्या बेडग ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी सदाशिव तुकाराम मगदूम वय 42 राहणार समडोळी तालुका मिरज यांच्याकडील पिशवीतून लंपास केली सदरची घटना 30 नोव्हेंबर 2022 रोजी घडली आहे याबाबत महसूल कर्मचारी सदाशिव तुकाराम मगदूम यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात मिरज शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -