करवीर तालुक्यातील म्हाळुंगे येथील लक्ष्मी एकनाथ पाटील या 75 वर्षाच्या महिलेचा मृतदेह निगवे शेळवाडी दरम्यानच्या ओढ्याजवळ सापडला 23 तारखेपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या अंगावर दहा तोळे सोने होते ते काढून घेऊन खून करण्यात आल्याच बोललं जातंय.
म्हाळुंगे येथील लक्ष्मी पाटील ही महिला 23 नोव्हेंबर पासून बेपत्ता होती देवदर्शनासाठी जातो असे सांगून गेल्या होत्या. पण त्या घरी परतल्या नाही. त्यामुळे नातेवाईकांनी इस्पुर्ली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत शीताफिने या गुन्ह्याचा तपास केला. सदर महिला संशयित आरोपीच्या घरात गेल्याचे गावातील सीसीटीव्ही कॅमेर्यात निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले त्यावरूनच या खुनाचा उलगडा झाला असल्यास त्यांनी सांगितलं. महिलेच्या अंगावर दहा तोळे सोने होते यातूनच तिचा खून झाला असल्याची शक्यता आहे या संदर्भात गावातील
संशयित आरोपींना ताब्यात घेतला असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितलं. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा होता तर नातेवाईक आणि प्रवाशांनीही मोठी गर्दी केली होती.