शिरोळ तालुक्यात 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेत राजापूरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अनुसूचीत जमाती वर्गातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रावसाहेब रामु कोळी यांचा एकमेव अर्ज राहिल्याने सरपंच पदी कोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
याबाबत अधिकृत घोषणा अर्ज माघारी नंतर निवडणूक विभागातून होईल असे सांगण्यात येते. दरम्यान राजापूरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपा पक्षाचे रावसाहेब कोळी यांची तसेच ग्रा.प. सदस्य पदी अभिजीत रामचंद्र कोळी यांची बिनविरोध निवड झालेने भाजपा समर्थक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालची उधळण करून जल्लोष केला.