ई-कॉमर्स कंपनी Amazon येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची शक्यता आहे. याआधी कंपनीतील सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येईल, असा अंदाज वर्तवणयात येत होता. मात्र आता कंपनी जवळपास 20 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकू शकते. कंपनी आपल्या अनेक विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार आहे. कंपनीमधील केवळ छोटे कर्मचारीच नाही तर अॅमेझॉन बड्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. यामुळे आता Amazon कर्मचाऱ्यांवरील संकट वाढले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Amazon चे CEO अँडी जेसी यांनी नुकतीच पुष्टी केली की, कंपनी येत्या काही महिन्यांत कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. मात्र, कंपनी किती कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे, हे त्यांनी सांगितले नाही. नोव्हेंबरमध्ये वृत्त आले होते की, कंपनी 10,000 कर्मचार्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. मात्र आता ही संख्या 20 हजारांवर गेली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, फेसबुकची मूळ कंपनी मेटाने यापूर्वी कर्मचाऱ्यांची छाटणी केली होती. याशिवाय इतर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
नुकतेच अॅमेझॉनने मॅनेजर्सला कर्मचाऱ्यांच्या कामगिरीतील समस्या समजून घेण्यास सांगितले होते. Amazon चे जगभरात 1.5 लाख कर्मचारी आहेत. जर 20,000 लोकांची छाटणी केली तर ती एकूण कर्मचार्यांच्या 1.3 टक्के असेल. ज्या कर्मचाऱ्यांची छाटणी केली जाईल त्यांना 24 तासांची नोटीस आणि सेवेरेंस पे दिले जाईल. अॅमेझॉनच्या इतिहासातील ही चौथी मोठी टाळेबंदी असेल
Amazon च्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! आता 20000 कर्मचाऱ्यांना नारळ देणार कंपनी
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -