Monday, July 7, 2025
Homeक्रीडाभारतीय संघाला धक्का, रोहित शर्मासह तीन खेळाडू तिसऱ्या वन-डेतून बाहेर..!!

भारतीय संघाला धक्का, रोहित शर्मासह तीन खेळाडू तिसऱ्या वन-डेतून बाहेर..!!

बांगलादेशविरुद्ध वन-डे मालिका गमावणाऱ्या भारतीय संघासाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. भारत विरुद्ध बांगलादेशमधील अखेरच्या वन-डेतून कॅप्टन रोहित शर्मासह तीन खेळाडू बाहेर पडले आहेत.

पहिल्या सामन्यात भारताचा एका विकेटने पराभव झाला. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने 5 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. त्यात या सामन्यात रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. टीम संकटात असताना, तो मैदानातही उतरला. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

रोहित, चहर, कुलदीप बाहेर

चितगाव येथे 10 डिसेंबरला होणाऱ्या तिसऱ्या वन-डे सामन्यातून रोहित शर्मा याच्यासह वेगवान गोलंदाज दीपक चहर व कुलदीप सेन यांनीही दुखापतीमुळे माघार घेतली आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही माहिती दिली.

राेहित आता मुंबईला परतणार असून, तेथे तज्ज्ञ त्याची तपासणी करतील. त्यानंतरच कसोटी मालिकेसाठी तो उपलब्ध असेल की नाही, याची माहिती कळेल. मात्र, शेवटच्या वन-डेत हे तिघेही खेळणार नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -