पुण्यातील चाकण परिसरातील राणूबाईमळा परिसरातील एका दुमजली बिल्डिंगमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर घराची भिंत कोसळून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
चाकणमधील राणूबाई मळ्यातील एका दुमजली बिल्डिंगमध्ये बुधवारी रात्री 8 वाजून 30 मिनिटांला गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता, की स्फोटात चंद्रभागा पांडुरंग बिरदवडे (वय-75) यांचा मृत्यू झाला. तर लक्ष्मीबाई बिरदवडे (वय- 78), तुकाराम परशुराम बिरदवडे, संगीता सुरेश बिरदवडे (वय-50), अक्षय सुरेश बिरदवडे (वय-18), वैष्णवी सुरेश बिरदवडे (वय-20) किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेत एका भाडेकरू देखील जखमी झाला आहे. घटनास्थळी तातडीने पोलिस पोहोचून त्यांनी मदतकार्य सुरू केलं. स्थानिक नागरिक देखील मदतीला धावून गेले. जखमींवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण परिसरातील रानुबाईचा मळ्यातील बिल्डिंगमध्ये भाऊ परशुराम बिरदवडे यांचं कुटुंब राहाते. बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारात त्याच्या घरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता, की यात चंद्रभागा बिरदवडे यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच घराची भिंत कोसळल्याने घरातील इतर सदस्य जखमी झाले. जखमींवर खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्या उपचार सुरू आहेत. सिलिंडरमधून गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
स्फोटाने चाकण परिसर हादरला
अचानक झालेल्या स्फोटामुळे चागण परिसर हादरला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. त्यामुळे बाहेरील राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात.