चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भारताने धास्ती घेतली आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला खबरदारीच्या सूचना दिल्यानंतर आता सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा आवाहन करण्यात आला आहे. कोल्हापुरात देखील करवीर निवासीनी अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी उद्यापासून मास्क सक्ती असणार आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी बोलताना दिली.
भाविकांना मास्क सक्ती करायची का नाही? याबाबत राज्य सरकारकडून सूचना आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. अशी माहिती ही शिवराज नाईकवडे यांनी दिली.